'ब्रम्हकमळ’ हे नाव भगवान ब्रम्हदेवाच्या नावावरुन पडलेले आहे. या फ़ुलाचे वैशिश्ट्य म्हणजे ते मध्यरात्री उमलते. जसजशी रात्र होते तसतसे ते उमलायला लागते. ज्यावेळी ब्रम्हकमळ पूर्णपणे उमलते त्यावेळी त्याचा गंध परिसरात सर्वत्र पसरतो. त्या रात्रीपुरतेच त्याचे आयुश्य असते. मध्यरात्रीच्या आसपास ब्रम्हकमळ उमलतांना बघणे शुभ मानले जाते. ब्रम्हकमळाचे फ़ुल १४ वर्शातून एकदाच उमलत असल्याचे मानले जात असले तरी ते सत्य नाही. कारण आमच्या बागेत ब्रम्हकमळाचे झाड लावलेले असून त्याला दरवर्शी फ़ुले येत असल्याचे आम्ही बघतो. बर्याच वेळा झाडाला एका वेळी अनेक फ़ुले येतात आणि एकाच वेळी ती उमलतात. ब्रम्हकमळ ही पानफ़ुटी वनस्पती आहे. म्हणजेच या झाडाला खोड नसते. या झाडाची पाने लांबलचक आणि पुधे जराशी टोकदार अशी असतात. पानांना अनेक पाने फ़ुटत असतात व झाडाची वाध होत असते. पानांची देठे लांब असतात. त्या देठावर ब्राम्हकमलाचे फुल उमलते. ही फुले दिसायला मोठी, पंढरीशुभ्र, असंख्य पाकळ्या असणारी असतात. फुलाचे देठ इंग्रजी ‘U’ आकाराचे आणि लाल रंगाचे असते. फुलाच्या खालच्या पाकळ्या बारीक, लाल रंगाच्या असतात.
एका वेळी अनेक फुले देखील फुलतात, तेव्हा ती मोहात पाडतात. त्यांचे मोहक रूप आणि सुवास आपल्याला आकर्षित करतात.
Its my favorite...but never seen it...i really want to see it:)
ReplyDeletenice
ReplyDeleteछान
ReplyDeleteश्रीब्रम्हकमळ उमळण्याचा योग आला माझ्या घरी वासिंद येथे
ReplyDelete।।जय हरी विठ्ठल श्रीहरी विठ्ठल।।
।।पांडुरंग हरी वासुदेव हरी।।
।।पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ।।
।।श्री ज्ञानदेव तुकाराम ।।
।।पंढरीनाथ महाराज की जय।।
।।गोपाळ कृष्ण महाराज की जय ।।
।।पवनसुत हनुमान की जय ।।
।।छत्रपती शिवाजी महाराज की जय ।।
।।बोलो रे भाई सब संत की जय।।